Wednesday, April 20, 2011

संस्कार की शिक्षण ?

संस्कार की शिक्षण ?
       'Education makes the man' शिक्षणाने  माणूस घडतो.  आजच्या  पिढीचे परदेशी शिक्षणाचे आकर्षण, तिथल्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहता या वाक्यात थोडासा बदल कारावास वाटतो. संस्कार आणि शिक्षणाने माणूस घडतो.'संस्कार' म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आजी अजोबानी  दिलेली अगदी कधीच न संपणारी आयुष्यभर  पुरुनही उरेल अशी शिदोरी. 'संस्कार'म्हणजे आपली संस्कृति, आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या गोष्टींची  उकल, एक असे कुरियर जे generation  to  generation  सर्वांकडे जात असत.
शिक्षणाने माणसाचा बौद्धिक विकास घडतो, त्याला ज्ञनाच्या नव्या शाखा माहित पडतात पण  शिक्षणाच्या जोडीला जर 
संस्कराची शिदोरी असेल तर करत असलेल्या गोष्टीला नवा अर्थ मिळतो. शिक्षणाच्या अनेक पायऱ्या चढूनही संस्कारांमुळे जमिनीवरच असलेली अनेक उदाहरने आपल्याला माहित आहेत. 
आज आपण 'हम  दो हमारे दो' म्हणून कुटुंबाचा चौकोन साधू पाहतो पण त्याचवेळी या चौकोनाच्या चारही  बाजु वेगवेगळ्या  असल्याने बहुतांशी त्यात समन्वय साधत नाही म्हनुनच  या बाजूना जोडण्यासाठी एक तरी कर्ण म्हणजे आजी आजोबा घरात असतील तर ते खरया अर्थाने कुटुंब होइल. वाडवडिलांकडून  मिळालेले संस्कार हेदेखील शिक्षणाएवढेच  महत्त्वपूर्ण  आहेत. शिक्षणामुळे माणसाच्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते आणि संस्कार हे त्याच्या भविष्याला योग्य आकार देण्यात मदत करतात. सध्याच्या धावत्या युगात शिक्षणाबरोबर संस्काराचीही ठेव आपणच जपायला हवी.